Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, लवकरच मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गती..

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी शिवसेना पद्धतीने संसदेत आंदोलन केले होते. ‘वीरांची भाषा, शूरांची भाषा मराठी भाषा’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या खासदारांनी दिल्ली सुद्धा दणाणून सोडली होती मराठीला अभिजात भाषा देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली दरबारी प्रलंबित असून मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरही या सरकारनेही मराठीची उपेक्षाच केली आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडकी भरवत शिवसेनेने खास आपल्या स्टाइलने संसद भवनाबाहेर आणि लोकसभेतही तितक्याच आक्रमकपणे मराठीचा विषय लावून धरला होता.

आता लवकरच त्याचे यश भेटणार आहे अशी चिन्ह दिसून येत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी आज राज्यसभेत दिली. मराठीसंदर्भात मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली असून या विषयात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. साहित्य अकादमीच्या मार्गदर्शनाखालील भाषिक तज्ञ समिती व आणि सांस्कृतिक खात्याबरोबर या विषयावर चर्चा सुरू असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.

Leave a comment

0.0/5