Skip to content Skip to footer

आरोग्य केंद्रामध्ये दक्षता समिती स्थापन करणार – डॉ. नीलम गोरे

बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या उसतोडणीला जाणाऱ्या महिलांचे गर्भाशय काढून टाकण्याच्या बातमी नंतर सर्वत्र राज्यात खळबळ उडाली होती. त्याचमुळे बीड जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक विधान भवनात घेण्यात आली. समितीत आमदार विद्या चव्हाण यांच्यासह सात सदस्य आहेत.

गर्भाशय शस्त्रक्रिया करण्याबाबत तज्ञांच्या मदतीने ‘एसओपी’ करण्याची कार्यवाही सुरू असून त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना समितीच्या पहिल्या बैठकीत देण्यात आल्या. या हंगामासाठी ऊसतोडणीकरिता जाणाऱया महिलांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना यावेळी डॉ. गोऱहे यांनी केल्या. बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5