Skip to content Skip to footer

बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार याद्या आधार कार्डशी जोडण्यात येणार-मुख्यमंत्री

देशात होणाऱ्या प्रत्येक मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होत असते अशी बोंब विरोधक तथा सत्ताधारी पक्ष मारत असतो. निवडणूक अयोग या होणाऱ्या बोगस मतदानावर टाच आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते परंतु त्यांना हवेत तेवढे यश अद्याप मिळालेले दिसून येत नाही आहे. या बोगस मतदान प्रकरणात सरकारने कडक पाऊल उचलण्याचे ठरविले आहे अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून बोगस मतदानाची संख्या वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी मतदार याद्या आधार कार्डशी लिंक करणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल.

या अधिवेशनात विरोधकांनी ईव्हीएम ताशेरे ओढले. तसेच बऱ्याच वेळा बोगस मतदान याद्यांसंदर्भात वारंवार तक्रारी आल्या आहेत. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बोगस मतदार याद्यांबाबत मागील पाच वर्षांत अनेक वेळा तक्रार केली. या याद्या आधारशी जोडल्यास नक्कीच बोगस याद्यांची समस्या दूर होऊ शकेल.

त्यामुळे या याद्या आधार कार्डशी जोडण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार, असल्याचं सांगितल. दरम्यान जर मतदार याद्या आधारकार्डशी जोडण्याचा निर्णय झाला तर महाराष्ट्रासह देशात होणाऱ्या बोगस मतदानावर आळा बसेल यात शंका नाही.

Leave a comment

0.0/5