Skip to content Skip to footer

काँग्रेस प्रवक्त्याने वंचितच्या प्रस्तवाची उडवली खिल्ली….

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचित सावंत यांनी ट्विट करुन वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव धुडकावला आहे. काँग्रेसने वंचितच्या ऑफरची खिल्ली उडवली आहे. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ऑफरवरुन उत्तर देताना, काँग्रसने हे गमतीशीर असल्याचे म्हटलंय.

वंचित बहुजन आघाडीने दिलेली ४० जागांची ऑफर म्हणजे अत्यंत गंमतीशीर आहे, असे ट्विट सावंत यांनी केले आहे. पण, गांभिर्याने विचार करावा, असेही सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस बरोबर युती नाही पण वंचितचा संघर्ष वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जातं आहे.

 

देशात आणि राज्यात अभूतपूर्व अशा तऱ्हेचा धोका सामाजिक ऐक्याला व लोकशाहीला निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी काँग्रेस पक्ष गांभीर्याने प्रयत्न करत आहे. संविधानाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी करण्यासाठी काँग्रेस पक्ष ज्या गांभीर्याने विचार करत आहे, त्याच गांभिर्याने इतर पक्षांनीही विचार करावा अशी अपेक्षा असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

परंतु काही दिवसापूर्वी जागा वाटपा बाबत केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी बोलणार असल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5