Skip to content Skip to footer

महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश……

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात आउटगोइंग चूल झालेली आहे. जिथे काँग्रेस अध्यक्ष हार पत्करून आपल्या पदाचा राजीनामा देत असेल. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला दोन महिने लोटले तरी अजून सुद्धा एक चांगला अध्यक्ष भेटत नसेल त्या पक्षाचे भवितव्य काय असेल याच विचाराने आज काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडताना दिसत आहे.

त्यातच आज महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रवक्ते आनंद दुबे यांनी सुद्धा आज युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन दादर येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5