Skip to content Skip to footer

इतर नेते मुंबईत तुंबलेल्या पाण्यावर टोमणे मारत असताना,आदित्य ठाकरे मात्र भर पावसात परिस्थितीचा आढावा घेत होते.

राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी, तीन-चार दिवसात पडलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुख्यतो मुंबईतील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते. आकाशातून बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे मुंबईची लाइफ-लाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेतील तिन्ही मार्गावर याचा परिणाम झालेला दिऊन येत होता. आता याच परिस्थितीचा विरोधक फायदा घेणार नाही असे होऊ शकते का? मुंबईत तुंबलेल्या पाण्याला संपूर्णपणे फक्त बृहमुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे अशी ओरड राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देणे सुरु केले होते. कारण मानपावर सत्ता ही शिवसेना पक्षाची आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेवर टीका करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसून येत होता.

एकीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण तुंबलेल्या पाण्यावर राजकारण करताना दिसत होते तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भर पावसात मनपाचे मुख्य कार्यालय गाठून पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.

एकीकडे याच नेत्यांची पोर पावसाळ्यात मजा करण्यासाठी लोणवळा अंन कोकण गाठतात तिथे मुंबईतील परिस्थिती कशी लवकरात लवकर पूर्वरत करता येईल आणि त्यासाठी काय उपाय योजना करत येईल याची चर्चा मनपा आयुक्तांबरोबर करताना आदित्य ठाकरे दिसून येत होते.

मुंबईच्या एकंदर पाहणीनंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना गरज नसेल तर बाहेर पडू नका तसेच पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असं आवाहन केलं तसेच साचलेलं पाणी वाहून जावं यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईकरांना स्वतःची कायजी घेण्याचा सल्ला सुद्धा दिला.

एकीकडे मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी सर्वतोपरी कायजी घेणारे आदित्य ठाकरे आहेत तर दुसरीकडे पावसाळ्यात बाहेर पडणारे डराव-डराव करणारे विरोधक सुद्धा आहेत  आणि मुंबईची देखभाल चांगल्या प्रकारे कोण करू शकतो याची कल्पना सुद्धा मुंबईकरांना चंगल्या प्रकारे आहे. म्हणूनच आज या आरोप करणाऱ्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून काही तरी शिकून घेतले पाहिजे. कारण राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिकच महत्व दिले पाहिजे हीच खरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यात दिसून येते.

Leave a comment

0.0/5