Skip to content Skip to footer

काँग्रेसला अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना -शिवसेना

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सध्या प्रभारी अध्यक्ष नेमला आहे. अशातच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधी यांच्या इतरांवरील पक्षपाताच्या आरोपांचे नंतर पाहू, पण काँग्रेसचे संघटन उभे करणे व लोकांना कामास लावणे याच्या आड तर कोणी आले नव्हते. राहुल गांधींच्या राजीनाम्याचा व त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर केला पाहिजे. काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना! अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा आता सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप सतत होत असतो. त्या आरोपातून पक्षाला एकदा तरी मुक्ती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलले आहे. राहुल गांधी म्हणजे नेहरू, इंदिराजी किंवा राजीवही नव्हेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने देशात हलकल्लोळ वगैरे झालाय, लोक रस्त्यावर आलेत असे चित्र नाही, पण काँग्रेस पक्षात मात्र भूकंप झाला आहे.

भूकंपाच्या हादऱ्यातून पडझड होते. काँग्रेस पक्ष आधीच इतका कोसळला आहे की, पडझडीसाठीही तो उरलेला नाही. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात मोठी कामगिरी बजावलेल्या पक्षाची ही शोकांतिका आहे. काँग्रेस पक्षाच्या दारात चिरा-पणती लावायला तरी कुणी उरेल काय? असे आजचे चित्र आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राहुल गांधी यांनी नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारिणीवर सोपवली आहे, पण काँग्रेसला संजीवनी देऊ शकेल असा एकही नेता दिसत नाही. मोतीलाल व्होरा (वय 89) व सुशीलकुमार शिंदे (वय 78) हे दोन जुनेजाणते आहेत.

तिथे आज भाजप आहे. मोदी व अमित शहा यांच्या जोडगोळीने सारा देश व्यापला आहे. संघटन, यंत्रणा, सत्ता व आर्थिक ताकद या तुलनेत काँग्रेस भाजपच्या पिछाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी मेहनत घेतली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

शिवाय दलित आणि मुसलमान तसेच उच्चवर्णीय हा काँग्रेसचा पारंपरिक आधार प्रादेशिक पक्षांनी तोडला आहे. काँग्रेसचे अनेक वतनदार लोकांनी फेकून दिले व दरबारी राजकारण यापुढे चालणार नाही असा स्पष्ट संदेशच या निवडणुकीतून दिला.

Leave a comment

0.0/5