Skip to content Skip to footer

राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकारण म्हणून पहिले – अरुण दुधवडकर.

जयसिंगपूरचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत, त्यांनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिले. अशी टीका अरुण दुधवडकर यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेने भगवा फडकवला. यानिमित्त शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शुक्रवारी जयसिंगपूरमधील कल्पवृक्ष गार्डनमध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली होती.

त्यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टीं यांच्यावर निशाणा साधला. राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत. त्यांनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिले, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला त्यांचा पराभव झाला. असे दुधवडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची खऱ्या अर्थाने जाण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती केली असून शेतकऱ्यांसह सर्वच प्रश्न शिवसेना सोडविण्यास वचनबद्ध असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

1 Comment

  • Ratnesh पाटील
    Posted July 5, 2019 at 3:57 pm

    फोटो अरूण दुधवडकर यांचा नसून सदा सरवणकर यांचा आहे .

Leave a comment

0.0/5