Skip to content Skip to footer

मनसेच्या जाड भिंगाच्या चष्म्याला प्रा. महाडेश्वराचे सडे-तोड उत्तर…

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. मनसेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवत, महापौरांना आता तरी स्पष्ट दिलेस अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

आता महाडेश्वरांनी मनसेच्या या टीकेला उत्तर दिले आहे. महाडेश्वर यांनी ‘जाड भिंगाच्या चष्माची गरज मला नसून मनसेला आहे. मला अजून चांगली दृष्टी आहे. चष्म्याची भेट देणारे किती वेळा पाण्यात उतरून लोकांसाठी काम करत होते?’ असा सवाल करत महापौर यांनी मनसेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत जागोजागी पाणी तुंबलेले असताना देखील मुंबईत उभारलेल्या नव्या पम्पिंग स्टेशनमुळे पाण्याचा निचरा जलदगतीने झालेला दिसून आला होता. तसेच मुंबई पूर्वरत सुरळीत चालू झालेली दिसून आली होती. परंतु मुंबईत झालेल्या पावसावर सुद्धा मनसे पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत असताना दिसून आला होता.

Leave a comment

0.0/5