Skip to content Skip to footer

नितेश राणेंनी चिखल टाकलेल्या उपअभियंत्याच्या घरी चंद्रकांत पाटलांची भेट…..

आमदार नितेश राणेंनी चिखलाची आंघोळ घातलेल्या बांधकाम उपअभियंत्याच्या घरी जात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते.

दरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम उपअभियांता प्रकाश शेडेकर यांच्या घरी जात कुटुंबियांची भेट घेतली आहे. इतकेच नव्हे तर कुटुंबाचं सांत्वन करत राज्य सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, काळजी नसावी, असे आश्वासनही दिले.

मंत्री पाटील यांनी बांधकाम उपअभियंत्याच्या घरी जाऊन भेट दिल्यामुळे भाजपात आणि राणे परिवारात काही तरी खटकले अशीच चाहूल लागते. तसेच लोकसभा निवडणुकीला नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपा महायुतीच्या विरोधात आपल्या मुलाला म्हणजे निलेश राणेला स्वाभिमानी पक्षातून उभे करून एकतर्फी भाजपा पक्षा बरोबर वैर घेतले होते. म्हणूनच आज महसूल मंत्री पाटील यांनी उपअभियंत्याच्या घरी दिलेली भेट म्हणजे राणे यांना सूचक इशाराच भाजपाने दिलेला आहे असेच आज म्हणावे लागेल.

Leave a comment

0.0/5