Skip to content Skip to footer

नितेश राणे यांचे विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी….

अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे याचे विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे.नितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती.

नितेश राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर अनेक कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी ३ वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a comment

0.0/5