Skip to content Skip to footer

अशोक चव्हाण पूर्णवेळ नांदेड मध्येच राहणार…..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हान आता पुढील तीन महिने पूर्ण वेळ नांदेड मध्येच राहणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला त्यांचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नांदेड मध्ये आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपला मोर्चा नांदेड शहरकडे वळविला आहे. त्यात मुंबई काँग्रेस अध्यक्ष देवरा यांनी राजीनामा दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी चव्हाणांकडे खासदारकी आणि प्रदेश अध्यक्ष अशी दोन्ही पदे होती. आता दोन्ही नाहीत. पत्नी अमिता यांच्या भोकर मतदारसंघातही विशेष मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ३ नावांची शिफारस करण्यात आली असून बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसच्या देशभरातील १२ प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र, नियुक्त्यांचा निर्णय होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात यापुढे प्रदेशाध्यक्षाबरोबर राज्यात पाच विभागवार कार्याध्यक्ष नियुक्तीचा विचार आहे.

अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यातच निरुपम यांनी पुन्हा देवरा यांच्यावर टीका केलेली आहे. राजीनामा त्यागाच्या भावनेतून दिला जातो. इथे राजीनामा देताना राष्ट्रीय पद मागितले जाते आहे. हा राजीनामा आहे की वरती जाण्याची शिडी, अशी टीका काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी पदाचा राजीनामा देणारे मिलिंद देवरा यांच्यावर केली आहे.

Leave a comment

0.0/5