Skip to content Skip to footer

मिलिंद देवरांपाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे यांचा देखील राजीनामा……

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेस मधील वरिष्ठ आणि वजनदार नेत्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणे सुरू केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात काँग्रेस पक्षाला रिक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे

राहुल गांधींपाठोपाठ आता काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पराभवाची जबाबदारी घेऊन त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

रविवारी दुपारी मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवरा यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांची काहीच दिवसांपूर्वी संजय निरुपम यांच्या जागी निवड करण्यात आलेली होती.

Leave a comment

0.0/5