Skip to content Skip to footer

निरुपम यांचा देवरांना टोला, राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी……

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु हा राजीनामा फक्त वरच्या पायरीवर जाण्याचा मार्ग तरी नाही असा टोला माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी देवरा यांना लगावला आहे. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी मिलिंद देवरा हे दिल्लीत जाऊ शकतात. राजीनाम्या संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राजीनाम्यात त्यागाची भावाना अंतर्भुत असते, मात्र इथे तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे असं म्हणत निरुपम यांनी देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave a comment

0.0/5