Skip to content Skip to footer

राज्य सरकारने पुढे उज्वला गॅस योजना राबवावी-जयदत्त क्षीरसागर

गरीब कुटुंबासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या उज्वला गॅस योजनेतून राहिलेल्या लाभार्थ्याना आधार देण्यासाठी राज्य सरकारने पुढे येऊन ही योजना पुढे चालू ठेवावी. तसेच आधार कार्ड धारकांना रेशन वरील धान्य द्यावे या आग्रही मागणी साठी रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकारने या दोन्ही योजनांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यासह राज्यातील सामान्य कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी दोन अतिशय म्हतवाच्या मागण्याचा पाठपुरावा केला. राज्यातील सामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना राबवली मात्र या योजनेचा लाभ मिळू न शकलेल्या सामान्य कुटुंबासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू करावी आणि त्यांना मदतीचा आधार देत त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.

तसेच स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड नाही म्हणून लाखो कुटूंब स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळवू शकले नाहीत अशा कुटुंबाना रेशनचे धान्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी ज्या कुटुंबांकडे आधार कार्ड आहे अशा कुटुंबांना रेशन चे धान्य मिळावे. या दोन्ही योजना राज्यातील गरीब आणि सामान्य कुटूंबाना न्याय देणाऱ्या आहेत. सरकारने गांभीर्याने या प्रश्नांना मंजुरी द्यावी अशी मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a comment

0.0/5