Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांसह पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार विठ्ठलाची पूजा…

मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करतात, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र यावर्षी मुख्यमंत्र्यासोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सपत्नीक आषाढी एकादशीला महापूजेला दिसण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही नेते विठ्ठलाचं दर्शन घेऊन निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व विजयी खासदारांना घेऊन अयोध्येत गेले होते.

तसेच पंढरपुरात देखील जाण्याचं उद्धव ठाकरेंचं नियोजन होतं. मात्र दिल्लीत अधिवेशन सुरु झाल्यामुळे सर्व खासदारांना घेऊन जाता आले नव्हते. आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं पंढरपुरात महासभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.

Leave a comment

0.0/5