Skip to content Skip to footer

अपंग महिलेची फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हापरिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह चारजणांवर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशा किसन पाचर्णे यांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मंगलदास बांदल, दिगंबर टाकळकर, राहुल वसंत टाकळकर, यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जानेवारी २००८ ते ८ जून अखेर घडला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा पाचर्णे यांची तरडोबावाडी येथे दहा एकर जमीन असून ही जमीन आशा यांच्या आई व दोघी बहिणी अशा चार जणांच्या नावे आहे. जानेवारी २००८ मध्ये पाच एकर जमिनीचा व्यवहार एक कोटी रुपयांत मंगलदास बांदल यांच्या बरोबर ठरला मात्र बांदल यांनी ठरलेल्या व्यवहारापैकी केवळ १० लाख रक्कम देत उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली असा आरोप आशा पाचर्णे यांनी लावला असून पोलिसांनी सदर घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment

0.0/5