Skip to content Skip to footer

डुबणाऱ्या इंजिनला हाताचा सहारा….

लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता भाजपा विरोधात अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. मसनेच्या सभेला जमत असलेली गर्दी पाहून कुठेतरी भाजपाला धक्का बसेल असेच वाटत होते. परंतु राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेची काही फारशी जादू महाराष्ट्राच्या मतदारांवर झालेली दिसून आलेली नव्हती. काल राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली. परंतु मनसे पक्षाचे २००४ ला आपले आमदार याच ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून आणले होते. मग तेव्हा विरोध न करता आताच राज ठाकरे यांचा इव्हीएमला विरोध का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

दिल्लीत मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. अशी बातमी आजच्या सर्वच वर्तमान पत्रात झळकत होती. या भेटीमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीला नवीन समीकरण तयार होऊ शकते अशी शक्यता वर्तविला जात आहे. ज्या काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आणि राहुल गांधींवर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत विरोधाची तोफ डागून राजकारण केले त्यांच्याच भेटीला राज ठाकरे कसे काय जाऊ शकतात. असाच प्रश्न आजच्या तमाम मराठी माणसाला पडलाच असेल. कारण राज ठाकरे यांच्या मराठी मुद्याला महाराष्ट्रात फक्त काँग्रेस पक्षानेच विरोध केला आहे.

आज राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस बरोबर हात मिळवणी करण्याचे संकेत दिलेले आहे. परंतु दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष सत्तेत येण्यासाठी आपल्या पक्षाच्या तत्वाशी वाटाघाटी करू शकतात हे आज दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सिद्ध झालेले आहे.

परंतु राज ठाकरे यांची काँग्रेस बरोबर होत असलेली युती महाराष्ट्रातील जनता स्वीकारेल का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. तसे झाल्यास काँग्रेसच्या सभेला एकाच व्यासपीठावर राज ठाकरे आणि संजय निरुपम एकत्र बोलताना दिसले तर मराठी माणसाला आश्चर्य वाटायला नको.

Leave a comment

0.0/5