Skip to content Skip to footer

पवारांच्या नातेवाईकांनी दिली माझा हत्येची सुपारी – अण्णा हजारे

तत्कालीन खासदार पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती. पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला मिळालेल्या धमकीबाबत मी मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळीकडे दाद मागितली होती, अशी साक्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात मंगळवारी दिली. अशी माहिती जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिलेली आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात मोठा स्पोट होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्येप्रकरणी अण्णांची मंगळवारी साक्ष नोंदविली. जुलै २०११ पासून खटल्याला सुरुवात झाली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पाटील यांनी राजकीय वैमनस्यातून निंबाळकर यांची हत्या केली. माजी खासदार पद्मसिंह पाटील या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र पुरस्कार परत केले.

त्यानंतर मी उपोषणाला बसलो, सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला. चौकशीत पाटील दोषी ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याचा राग मनात ठेऊन त्यांनी मला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली होती.

याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे कळली, असेही अण्णांनी कोर्टाला सांगितले. पाटील यांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्यांकडे कोरा चेक सोपवला. त्यात हवी ती रक्कम टाका, अशीही त्यांनी ऑफर दिल्याची साक्ष अण्णांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आनंद यवलकर यांना सांगितले.

Leave a comment

0.0/5