Skip to content Skip to footer

गिरणी कामगारांसाठी म्हाडा कडून ५०९० घरांची घोषणा….

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यात भाजपा-शिवसेना सरकारला यश आलेले दिसून येत आहे.अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देण्याऱ्या गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे म्हाडा बांधणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या वृत्ताने मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच या घरांसह राज्यभरात एकूण १४,६२१ घरांसाठी १५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्याने जाहिरात काढण्यात येणार असल्याचेही या घोषणेत म्हंटले आहे. येत्या १५ ते २० दिवसांत म्हाडाकडून पुनर्विकास धोरण जाहीर होणार आहे. तसेच वसाहत सेवाशुल्क अहवाल १० दिवसात जाहीर होणार आहे.

विशेष म्हणजे यामध्ये मुंबईत ५०९०, नाशिक ९२, औरंगाबाद १४२, कोकण ५,३००, अमरावती १२००, नागपूर ८९१, पुणे २०००, एकूण १४,६२१ असा समावेश असणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेऊन राहू पाहणाऱ्या अनेक गिरणी कामगारांचे स्वतःच्या घरचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

Leave a comment

0.0/5