Skip to content Skip to footer

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे पिंजून काढणार अख्खा महाराष्ट्र.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल अशी माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांची “जन आशीर्वाद यात्रा” कोल्हापुरातूनच सुरू होत असल्यामुळे शिवसेनेला मिळालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे कोल्हापूर शहराला जास्तच महत्व शिवसेनेत प्राप्त झालेले आहे.

लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्तिथीत सुद्धा आदित्य ठाकरे यांनी दुष्काळ भागाचा दौरा करून तेथील दुष्काळग्रस्त शेतकऱयांशी संवाद साधून शिवसेने तर्फे मदत केली होती.

काही दिवसापूर्वी युवा संवादाच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी तरुणांशी संवाद साधला होता.आता तसाच संवाद राज्यातील इतर तरुण-तरुणींशी आदित्य ठाकरे या जन यात्रेच्या माध्यमातून साधू शकतात.

Leave a comment

0.0/5