Skip to content Skip to footer

बच्चू कडू यांनी घेतली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट…..

काही महिन्यात विधानसभेच्या तारखा जाहीर होणार आहे. सर्वच पक्षात मित्र पक्षाच्या भेटी-घाटी घेणे चालू झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. त्यातच शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला राज्यातील ग्रामीण भागात मोठा जनाधार लाभलेला आहे. याचा फायदा निवडणुकीत शिवसेना-भाजपला होऊ शकतो. मंत्रालयात शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीला बच्चू कडू यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू शिवसेना-भाजपशी युती करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे दिसत आहे. यावेळी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही मित्र पक्षांचा शोध घेत असल्याची शिवसेनेची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही अशाप्रकारच्या युतीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

सध्या विधानसभेत प्रहार संघटनेचा केवळ एक आमदार आहे. यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी ताकदीने मांडता येतील. त्यासाठी आम्ही शिवसेना-भाजपच्या या प्रस्तावावर विचार करू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

Leave a comment

0.0/5