Skip to content Skip to footer

उर्मिला मांतोडकर सोडणार काँग्रेस ?

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर यांचा भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला होता. हा पराभव मांतोडकर यांच्या जास्तच जिव्हाळी लागलेला दिसून येत आहे. म्हणूनच या पराभवाचे खापर त्यांनी तेथील स्थानीक कार्यकर्त्यांवर फोडलेले आहे तसे पत्र देखील त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना लिहिलेले आहे. मुंबई काँग्रेस मध्ये चालू असलेला देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील वादात मांतोडकर यांच्या आणखी एका वादाची भर पडलेली दिसून येत आहे.

संजय निरुपम यांच्या समर्थकांमुळेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याचा थेट आरोप ऊर्मिलाने पत्राद्वारे केला होता. त्यांचे हे नऊ पानी पत्रच सोमवारी व्हायरल झाले. त्यामुळे उर्मिला मांतोडकर नाराज असून ती लवकरच काँग्रेसला बाय-बाय करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाचा प्रस्तावही त्यांनी मांडला. पक्षाला खड्ड्यात नेणारा प्रस्ताव, अशी संभावना करत संजय निरुपम यांनी देवरा यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. मुंबई काँग्रेसमधील लाथाळ्यांच्या या नव्या अंकात ऊर्मिलाच्या पत्राची भर पडली.

१६ मे रोजी तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना ऊर्मिलाने हे नऊ पानी पत्र पाठविले होते. व्यक्तिगत हेवेदावे, अहंकारामुळे स्थानिक नेत्यांनी मुद्दामहून काँग्रेसचा प्रचार भरकटवल्याचा आरोप ऊर्मिलाने या पत्रात केला होता. उर्मिलाचे हे पत्र व्हायरल झाल्यामुळे तिने संताप व्यक्त केला आहे.

तसेच, काँग्रेसमधील अंतर्गुत धुसफूस आणि मुंबईतील काँग्रेस नेत्यांच्या उचापतीमुळे पक्षाला बाय-बाय करण्याचा विचार उर्मिलाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मांतोडकर काँग्रेसपासून दुरावत असल्याचे दिसत आहे.

Leave a comment

0.0/5