Skip to content Skip to footer

आदिवासी समाजाच्या वतीने खा. कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी……..

लोकसभा निवडणुकीला शिरूर मतदार संघात खा. पाटील यांचा पराभव करून खा. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरून निवडून आले होते. परंतु आता ते स्वतःच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी खा. अमोल कोल्हे यांनी आदीवासी समाजाच्या आरक्षणा विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे यांना मतदान करणाऱ्या अनेक आदीवासी समाजाची मने दुखावली होती. या निषेधात आदीवासी समाजाने कोल्हे यांच्या विरोधात बॅनर लावून आपला निषेध व्यक्त केला आहे.

“आदीवासी समाजाच्या मतांवर निवडून येऊन लोकसभेत धनगर आरक्षणाला पाठींबा देत आदिवासी समाजाच्या मुळावर उठनाऱ्या खा. अमोल कोल्हे यांचा आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुका आदीवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेद” अशा आशयाचे बॅनर खा. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघात झळकत आहे. आज कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचा रोष कोल्हे यांनी आपल्या अंगावर ओढावून घेतलेला आहे.

Leave a comment

0.0/5