Skip to content Skip to footer

मिलींद देवरा, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात……..

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरूपम तसेच कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. कुमार यांना मुंबई पोलिसांनी रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरून ताब्यात घेतलेले आहे. कर्नाटक काँग्रेसचे १० बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेल बाहेर पोलिसांनी जमावबंदी न करण्याचे आदेश दिले होते. तरीही काँग्रेस नेते हॉटेल बाहेर गर्दी करून उभे होते. कर्नाटकातील १० आमदार या हॉटेल मध्ये थांबलेले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकातील बडे नेते असलेले डी. कुमार हे हॉटेल बाहेर आपल्या कार्यकर्त्यांसह थांबले होते.

मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असे पत्र कर्नाटकच्या १० बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीले आहे.

आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही असेही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या सगळे १० आमदार रेनेसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5