Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांनी हातात बांधले शिवबंधन…..

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात आउटगोइंग अजूनही सुरुरच आहे. राष्ट्रवादी मधील अनेक डिग्गज नेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सेना-भाजपा पक्षाचा सहारा घेतलेला आहे. त्यातच आता अजून एक नाव समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग बरोरा यांनी हातातील घड्याळ काढून मनगटावर शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे .ठाण्यातील शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांच्या समवेत शहापूरमधील त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. शिवसेनेच्या कार्याने प्रभावित होऊन शहापूरमधील कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलो आहे, असे बरोरा यावेळी म्हणाले. बरोरा यांचे ४० वर्षांपासून राष्ट्रवादीशी, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.

Leave a comment

0.0/5