Skip to content Skip to footer

एकदा मैदान ठरवा, सदाभाऊ एकटा यायला तयार आहे…..

पिक विम्याच्या बैठकीमध्ये येऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याबद्दल पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती. चांगल्या सुरू असलेल्या कार्यक्रमात घोषणा देणे म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची काही देणेघेणे नाही हे सिद्ध होते. आम्हाला लढाईची माहिती आहे. एकदा तुमची मस्ती आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जिरवली आहे. त्यामुळे आज झालेल्या गोंधळामुळे शेट्टी यांचा झालेला पराभव जास्तच जिव्हाळी लागलेला दिसून येत आहे असेच जाणवते.

केवळ प्रसिद्धीची हवा त्यांच्या डोक्यात गेली असल्याचे सांगत राजू शेट्टी यांचे नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी टीका केली. एकदा मैदान ठरवा सदाभाऊ एकटा यायला तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले. आम्ही बहुजन समाजातून आलेलो आहोत. असा टोलाही त्यांनी शेट्टी यांचे नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी लगावला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला शेट्टी आणि खोत यांच्या संघर्ष वाढणार आहे असेच दिसून येते.

Leave a comment

0.0/5