Skip to content Skip to footer

ऊसतोड कामगारांसाठी फिरते स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या – डॉ. गोरे

महिलांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवण्याऱ्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ऊसतोड कामगारांसाठी फिरते स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी केलेली आहे. पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडलेले आहे. पुण्यातील कौन्सिल हॉल सभागृहात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सविस्तर सूचना देताना राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.

कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी व ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही.

डॉ. गोऱ्हे यांनी दिले. याचबरोबर ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a comment

0.0/5