Skip to content Skip to footer

जयंत पाटील विरोधात सदाभाऊ खोत मैदानात…..

खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने भाजपाकडे १३ जागेची मागणी केलेली आहे. त्या जागेत इस्लामपूर मतदार संघाचा सुद्धा समावेश आहे. इस्लामपूर हा मतदार संघ राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांचा मतदार संघ म्हणून समजला जातो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात खोत स्वतः मैदानात उतरणार आहे अशी माहिती खुद्द सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक जयंत पाटील यांना जड जाणार असेच दिसून येते.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला-मित्र पक्षाला २०० च्यावर जागा मिळतील. त्यामुळे विरोधकांनी इतर जागेवर प्रयत्न करावे असा टोला सुद्धा खोत यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीला लगावला आहे. जयंत पाटील यांच्याशी तुमचे सूत जुळले आहे असा प्रश्न पत्रकारांनी खोत यांना विचारता यावर स्पष्टीकरण देताना खोत म्हणाले की, माझी आणि जयंत पाटील यांची शेती जवळ-जवळ आहे त्यामुळे अधून मधून त्यांच्याशी चर्चा होते. परंतु त्यांच्यात आणि माझ्यात संघर्ष मागील ३० वर्षांपासून चालू आहे असे सुद्धा खोत यांनी म्हणून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5