Skip to content Skip to footer

काँग्रेस आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर ?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे अनेक कारणे सुद्धा होती. पण आघाडीतील नेत्यांचे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हेदेखील या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण होते. अशातच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच पॅटर्न विधानसभेला राबविताना दिसत आहे. राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत केली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपा-शिवसेनेच्या बाजूने लागल्याचं दिसताच विखेंनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर विखेंसोबत काँग्रेसमधील इतरही आमदार जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यावेळी विखे यांनी एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला. आता मात्र पुन्हा एकदा विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.

पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भारत भालके यांची भेटही घेणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे, असे सांगितलं जात आहे. मात्र आमदार भालके यांना विखेंच्या माध्यमातून युतीत आणण्याचे काम केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5