Skip to content Skip to footer

कांचन कुल यांचा प्रचार जिव्हाळी लागल्यामुळे माझ्यावर पवारांचे आरोप – मंत्री शिवतारे

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. विजय शिवतारे पुन्हा आमदार कसा होतो तेच बघतो, अशा शब्दात त्यांनी मला जाहीर धमकी दिली होती. जलयुक्त शिवार योजनेबाबत सध्या होत असलेले आरोप हे त्याच वक्तव्याचा पुढील अंक आहे. मला अडचणीत आणण्याकरीता पवारांचे अर्थातच राष्ट्रवादीचे व्यापक षडयंत्र असून 43 कोटींच्या कामात 200 कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो? असा सवाल राज्य जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर विधान परिषदेत अधिवेशनात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे. ते म्हणाले की, तालुक्‍यात 43 कोटींची जी कामे झाली ती अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने झाली आहेत. विशेष म्हणजे जे कंत्राटदार आहेत, ते सर्व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत, ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे राज्य जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5