Skip to content Skip to footer

शिवसेनेला बळकटी आली, भगवे दिवस सुरु झाले -उद्धव ठाकरे

शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे. आपल्यावर जनतेचा विश्वास वाढत आहे. शिवसेनेला बळकटी आली आहे. भगवे दिवस सुरू झाले आहेत. शिवरायांचा भगवा जसा लोकसभेवर फडकवला तसा येणाऱया निवडणुकीत विधानसभेवर फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. शहापूरमधील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाबरोबर बरोरा यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका आल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात लोक जातात. पण शिवसेनेत जी माणसं येत आहेत ती प्रलोभनं न दाखवता, विश्वासानं आणि प्रेमाने जिंकलेली माणसं आहेत. शिवसेनेला जे यश आज मिळत आहे ते लोकांच्या विश्वासामुळेच.

आपण लोकांची सेवा करतोय. लोकांचा विश्वास आपल्यावर वाढतोय. शिवसेना हा विश्वास सार्थ ठरवेल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आनंद दिघे यांनी जी विजयाची बीजे पेरली त्यामुळे ठाणे जिल्हा हा नुसता बालेकिल्ला नाही तर अभेद्य बालेकिल्ला झाला. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. येणाऱया लाटा यावर येऊन फुटल्या, पण या अभेद्य किल्ल्याला साधा चरासुद्धा गेला नाही असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5