Skip to content Skip to footer

आघाडीला कंटाळलेले नेते माझा संपर्कात – राधाकृष्ण विखे पाटील

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा पक्षात प्रवेश करून मंत्री मंडळाच्या विस्तारात गृहनिर्माण राज्य मंत्री पद मिळविले होते. आता पुन्हा त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याची झोप मात्र नक्की उडालेली दिसून येणार आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते आघाडीच्या राजकारणाला कंटाळले असून भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. तसेच अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याच विखे पाटील म्हणाले आहेत. सोलापूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राधाकृष्ण विखे आता पक्के भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते राधा कृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजप प्रवेशाची इच्छा बोलून दाखवत आहेत.

तसेच अनेक नेते संपर्क साधत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान आज पर्यंत  कॉंग्रेस–राष्ट्रवादीचे नेते भाजप मध्ये येण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरा बाहेर रांगा करत होते. मात्र आता महाजनांच्या घरी गर्दी वाढल्याने. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपला मोर्चा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे वळवला असल्याच दिसत आहे.

Leave a comment

0.0/5