Skip to content Skip to footer

डावी आणि उजवी विचारसरणी येत्या काळात अस्तित्वात राहणार नाही–आदित्य ठाकरे

गतिक पातळीवर राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारची वैचारिक भूमिका राहिलेली नाही. ‘डावी’ आणि ‘उजवी’ अशी विचारसरणी येत्या काळात अस्तित्वात राहणार नाही. लोकांच्या समस्यांवर तत्काळ उत्तर शोधून देणे, याच विचारसरणीचा राजकीय पक्षांना अवलंब करावा लागेल, असे मत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या शैक्षणिक कामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

लोकांच्या समस्यांवर तत्काळ उत्तर शोधुन देणं या विचारसरणीचा सर्व राजकीय पक्षांना अवलंब करावा लागेल, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, राजकीय पक्षांची भूमिका शहरातील जीवनमान सुधरवण्यासाठी हवी, असे मत ही आदित्य ठाकरेंनी मांडलेले आहे. येत्या शुक्रवार पासून आदित्य ठाकरे यांचा “जन आशीर्वाद दौरा” प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यावेळी ते राज्यातील अनेक भागातील नागरिकां भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. या दौर्याला कोल्हापुरातून सुरवात होणार आहे.

Leave a comment

0.0/5