Skip to content Skip to footer

जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी हा नेता मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढविण्यासाठी भाजपाने रणनीती आखलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना आगामी विधानसभेला यश मिळविणे तसे कठीणच जाणार आहे. इस्लामपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षापासून याच मतदार संघातुन ते विधानसभेवर निवडून जात आहे. तसेच त्यांनी या भागात आपले वजन देखील निर्माण केले आहे. आता याच मतदार संघात भाजपाने कमळ फुलवण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर वैरी समजले जाणारे मंत्री सदाभाऊ खोत यांना इस्लामपुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा बेत आखला आहे.

आक्रमक शेतकरी नेते अशी ओळख असणारे सदाभाऊ खोत हे विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबतच जाणार, हे आता जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची भाजपसोबत युती होण्याची शक्यता आहे. सदाभाऊ यांनी विधानसभेसाठी भाजपकडे जागांची मागणीही करून टाकली आहे. त्यात त्यांनी जयंत पाटील हे आमदार असलेल्या इस्लामपूर मतदारसंघाचीही जागा आपल्याकडे मागितली आहे. तसेच या जागेवरून मी स्वत: लढण्यासाठी इच्छुक आहे, असंही खोत यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदाभाऊ खोत यांना इस्लामपूरमधून लढण्यास बळ देऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे अधिकच उस्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5