Skip to content Skip to footer

पार्थ निवडून यावा इच्छा होती तर, बारामती मधून का उमेदवारी दिली नाही-चंद्र्कांत पाटील

महसूल मंत्री चन्द्रकातदादा पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाढ लोकसभा निवडसणुकीच्या निकालानंतर सुद्धा संपलेले दिसून येत नाहीत. तसेच येणाऱ्या विड्नसभा निवडणुकीला ते अजून वाढण्याची शक्यता वाटेत आहे. आज पुन्हा एकदा पाटील यांनी शहराद पवार यांना लक्ष केले आहे.

बारामती हा मतदार संघ सुरक्षित आहे म्हणून तिथे सुप्रिया सुळे आणि मावळमध्ये निवडून येण्याची खात्री नसल्याने तिथे पार्थ पवार यांना उमेदवारी दिली असा आरोप करून जर तुम्हाला पार्थ निवडून यावा अशी इच्छा होती तर बारामतीमधून पार्थला उमेदवारी का दिली नाही असा सवाल करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टिका केली आहे. महाबळेश्वर येथे भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, माणसे टिकविता येत नाही आणि ते भाजपावर आरोप करतात यालाच नाचता येत नाही अन अंगण वाकडं अशी कॉंग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाली आहे. निवडून येता येत नाही म्हणुन ईव्हीएम मशिनवर खापर फोडायचे. आम्ही जर ईव्हीएम घोटाळा केला असता तर आम्ही बारामतीमध्ये ही निवडून आलो असतो परंतु ते शक्य नाही. कारण ईव्हीएम मशिन मॅनेज करता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. अस देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हणून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5