Skip to content Skip to footer

वंचित २८८ जागांसाठी घेणार इच्छुकांची मुलखात.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागलेले आहे. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुती मध्ये लढणार असून दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय वंचितने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा वंचितने घेणे चालू केले आहे. १३ जुलै पासून इच्छुक उमेदवार मुलाखती देतील आणि उमेदवारीचा दावा करतील. वंचितने याअगोदर काँग्रेसला फक्त ४० जागांची ऑफर दिली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. यासाठी बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. पण पावसामुळे ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. वंचितने फक्त ४० जागांची ऑफर देऊन आघाडीमध्ये जाण्याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. त्यातच सर्व जागेवर लोकसभा प्रमाणे विधानसभा निवडणुकीला वंचित सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतांचे विभाजन रोखण्यासाठी काँग्रेस वंचितला आपल्या बरोबर घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु वंचितला भाजपाची बी टीम म्हणून काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतलेला दिसून येत आहे. आता वंचितने काँग्रेसला फक्त ४० जागा सोडलेल्या आहेत. या फॉर्मुल्यावर काँग्रेस कदापि वंचित बरोबर जाणार नाही. म्हणूनच वंचितने पुढील धोरण ठरवून २८८ जागेवर इच्छुक उमेदवार निवडण्याचे ठरविले आहे.

Leave a comment

0.0/5