वाहन तळावर स्थानिकांना निम्या दारात पार्किग, नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांची मागणी……..

वाहन | Parking at the doorstep of the vehicle, the corporator Ameya Ghole said

 

वाहन तळापासून ५०० मीटरच्या आत राहणाऱ्या रहिवास्यांना निम्या दारात पार्किंग करण्याची सुविधा मिळण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना भेटून दिलेले आहे. त्यामुळे मनपा वाहनतळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मुंबई सारख्या दाटीवाटीच्या शहरात गाडी लावण्यावरून अनेक वेळा मनपा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद झालेले दिसून आलेले आहे. या वादाचे पुढे भांडणात सुद्धा रूपांतर झालेले आहे

स्थानिक रहिवाशांकडूनही गाडी पार्क केल्यास पालिकेकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात असल्यामुळे पालिका आणि स्थानिक यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे स्थानिकांना एक घर, एक गाडी पार्कचे कूपन देऊन अर्ध्या किंमतीत पार्किंग सुविधा देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. पालिकेच्या सध्या असलेल्या २७ वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल.अशी माहिती देण्यात आलेली आहे.

 

 

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणार्‍या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार ७ जुलैपासून सर्व विभागात सुरू केलेल्या कारवाईत दररोज एक ते दोन लाखांचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेच्या वाहनतळांवर स्थानिकांना सध्याच्या निर्धारित दरांपेक्षा अर्ध्या दरात पार्किंग सुविधा उपलब्ध होईल. तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here