Skip to content Skip to footer

शिवसेनेचे दणका १४ हजार शेतकऱ्यांना मिळणार फळबाग विमा……

शिवसेनेने दम देताच विमा कंपन्या सुतासारख्या सरळ झाल्या आहेत. संभाजीनगर जिल्हय़ात १४ हजार ५८८ शेतकऱ्यांनी फळबाग विमा काढला होता. या विम्यापोटी एसबीआय इन्शुरन्स कंपनीने ७२ कोटी ६२ लाख रुपये मंजूर केले आहेत. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. जालना जिल्हय़ात चारा छावणीला भेट देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नडणाऱ्या पीक विमा कंपन्यांना सणसणीत इशारा दिला होता.

लासूर येथेही पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी घामाच्या पैशाने पीक विमा काढला आहे, असे बजावत शेतकऱ्यांचा एक पैसाही बुडाला तर या विमा कंपन्यांची मुंबईतील दुकानदारी बंद करण्यात येईल, अशा कडक शब्दांत कानउघाडणी केली होती.

शिवसेनेने इशारा देताच विमा कंपन्या सरळ झाल्या. गेल्याच आठवडय़ात जालना, बीड तसेच बुलढाणा जिल्हय़ातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हजारो कोटी रुपये मंजूर करण्यात आले. शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच कंपनीने हा विमा मंजूर केला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5