काँग्रेसवर आर्थिक संकट, कर्मचाऱ्यांचा पगार देण्याइतका पैसा सुद्धा नाही……

काँग्रेस | There is no financial funding for Congress, employees' salaries ...

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे काँग्रेसचे अनके पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना महिना उलटला तरी अजून पगार झालेले नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे पुरेसा पैसाही उरलेला नसल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत नसल्याने कॉंग्रेसला पक्षाला पैशांची तीव्र चणचण जाणवू लगालीय आहेत.

लोकसभेतल्या पराभवानंतर ते आणखी कमी झालेत. त्याचा पहिला फटका काँग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. यातल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. अनेक विभागांनाही खर्चात बचत करायला सांगण्यात आलंय. दरम्यान, कॉंग्रेसचा डेटा सेंटर विभाग हा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियात यापूर्वी ५० ते ५५ जण काम करत होते. आता फक्त ३० लोकांनाच ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here