Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या वाढत्या दबदब्यामुळे भुजबळ मतदारसंघ बदलणार ?

लोकसभा निवडणुकीला झालेला समीर भुजबळ यांचा पराभव तसेच नाशिक जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे वाढते वजन पाहून यंदा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आपला मतदार संघ बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाढत्या दबदब्याची धास्तीच भुजबळ यांनी घेतलेली दिऊन येत आहे.

बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र ते ज्या काळात तुरुंगात होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अभेद्य येवल्याचा बालेकिल्ला खिळखिळा केला. येवला नगरपरिषदेवर भगवा फडकवत जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ जागा देखील शिवसेनेने बळकावल्या. त्यामुळे छगन भुजबळ येवल्यातून विधानसभा लढण्यास कतरत आहेत. म्हणून त्यांनी या विधानसभा निडणुकीला मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघ छगन भुजबळ यांना सुरक्षित वाटत आहे. कारण या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे छगन भुजबळ या मतदारसंघातून लढू शकतात. परंतु याबद्दल छगन भुजबळ यांनी कसलीही पुष्टी दिली नाही मात्र येत्या काही दिवसात येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्कादायक बदल बातम्यांच्या मुख्यप्रवाहात येण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5