Skip to content Skip to footer

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक भाजपा पक्षात सामील…

काँग्रेस पक्षात नेत्यांची आउटगोइंग अजुन काही थांबलेली दिसून येत नाही आहे. गेली अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचा झेंडा हातात घेवून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मधील कॉंग्रेसच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षातील कामे जबाबदारीने पूर्ण पार पाडणाऱ्या किरपे, ता. कराड येथील माजी सरपंच व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब देवकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

किरपे यथे गेली अनेक वर्षे कॉंग्रेसमधून ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या आ. चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी कराड येथील एका कार्यक्रमात ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यातील माजी सरपंच दादासाहेब देवकर यांच्यावर कराड तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुका अध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवाजीराव देवकर यांची उपस्थिती होती.

Leave a comment

0.0/5