Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे-शिवसेना

शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात येत्या बुधवारी शिवसेना मुंबईत प्रचंड मोर्चा काढणार आहे. त्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. ‘भारती ऍक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार असून त्यात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. या संदर्भातील माहितीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत दिलेली होती.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी शिवसेना जिवाचे रान करत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर पोहचले आहेत. शेतकऱयांना सरकारने कर्जमाफी दिली; परंतु अनेक शेतकरी आजही त्यापासून वंचित आहेत. पीक विमा कंपन्यांनी अजूनही शेतकऱयांचे पैसे दिलेले नाहीत. या कंपन्यांना शिवसेना आपल्या स्टाइलने या मोर्चाद्वारे जाब विचारणार आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉटजवळून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा कंपनीच्या इमारतीसमोरील मार्गाने हा मोर्चा पुढे जाईल. नंतर जियो वर्ल्ड कंपनीच्या इमारतीला वळसा घेऊन ‘परिणी’ या इमारतीसमोर मोर्चा थांबेल. या परिणी इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ‘भारती ऍक्सा’ कंपनीचे कार्यालय आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ त्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱयांना शेतकऱयांच्या रखडलेल्या पीक विम्याच्या पैशांबाबत जाब विचारेल.

Leave a comment

0.0/5