Skip to content Skip to footer

शेकापने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागितल्या कोल्हापूरच्या पाच जागा.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला इशारा दिलेला आहे. काँग्रेस राष्ट्र्वादीने आघाडी करताना सम्मानाने सोबत घ्यावे. नाहीतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीला शेकापा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे.

याचदरम्यान कोल्हापुरातील टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. त्यावेळी भाजपाला रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने आम्हाला सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी आयोजित मेळाव्यात म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर करवीर विधानसभा मतदार संघ हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शेकापचा तो पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असेही भारत पाटील यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा, या विधानसभा मतदार संघांसाठी दावा केला आहे.

Leave a comment

0.0/5