Skip to content Skip to footer

थोरातांचा विजयाचा रथ रोखणार विखे-पाटील…..

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागलेली आहे. एक महिना उलटला तरी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष न भेटल्यामुळे हे पद रिक्तच ठेवण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांची होत असलेली गळती आणि काही महिण्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूका या सर्व पार्श्वभूमीवर अखेर बाळासाहेब थोरातांची अध्यक्ष पदी वर्णी लागलेली आहे. या नियुक्तीला अजून एक महत्वाचे कारण म्हणजे विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष,

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी केलेल्या अपमानामुळे विखे-पाटील यांनी काँग्रेस मध्ये राहून आपल्या मुलाचा म्हणजे भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला होता. यावर थोरातांनी विखे पाटलांवर कारवाही व्हावी असे पत्रच अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्ष अशोक चव्हान यांना धाडले होते. अखेर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विखे पाटील यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश करून राज्याचे गृहनिर्माण मंत्री पद सुद्धा पटकविले होते.

आता येणाऱ्या विधासभेला विखे पाटील- थोरात यांच्यातील वाद आणखी उफाळून येऊ शकतात. त्यामुळे थोरातांचा विजयाच्या दिशेने चाललेला रथ रोखण्यासाठी भाजपा चाल करून विखे पाटील यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवू शकते. त्यामुळे थोरातांनी विखे-पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा वचपा काढण्यासाठी विखे पाटील ताकतीने थोरातांचा त्यांच्याच मतदार संघात पराभव करणार असेच चित्र येणाऱ्या विधासभेला दिसून येईल..

Leave a comment

0.0/5