Skip to content Skip to footer

विधानसभा निवडणुकीत मनसे,काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असणार.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतलेली होती. या भेटीदरम्यान महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात सकारत्मक चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीत मनसे सुद्धा सामील होणार हे आता निश्चित झालेले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्र्वादीने मनसेला आघाडीत घेण्यासाठी हिरवा कंदील दाखविला होता. परंतु काँग्रेस मनसेला घेण्यास उस्सुक दिसलेली नव्हती.

परंतु लोकसभेला काँग्रेसने सपाटून मार खाल्ला आणि संपूर्ण राज्यात काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते आणि यंदाच्या विधानसभेला आपली तीच परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेस भाजपा विरोधात सम विचारी पक्षाला एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा बेत आखत आहे. मनसेला मुख्य विरोध होता तो प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांचा, महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतले तर उत्तर प्रदेश वोट बँकवर परिणाम होईल अशी भीती काँग्रेस पक्षाला होती. परंतु सध्या स्थितीत मनसेला सोबत घेण्यातच शहाणपण आहे अशी भावना सध्या काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्र्वादीने मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट, तसेच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक पाहून राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजाला मनसे सहारा देईल असेच वाटेत होते. असा विश्वास व्यक्त केला जात होता परंतु प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. मसनेला २०१४ च्या निवडणुकी पासूनच पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे २०१९ ची निवडणूक राज ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रूपाने मनसेला नवसंजीवनी भेटू शकते.

Leave a comment

0.0/5