Skip to content Skip to footer

तिवरे गावाच्या पुर्नवसनासाठी सिद्धिविनायक मंदिराने मदत करावी-आमदार उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात धरण फुटून २३ जणांना बळी गेला होता. तिवरे भेदवाडी गावातील धरणालगत असलेल्या गावातील अनेकांनाचा संसार उद्वस्थ झालेला होता. म्हणावे तर त्या पुराच्या पाण्यात संपूर्ण सासरचं वाहून गेला होता. त्या पाण्यात जनावरे सुद्धा वाहून गेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्राणास मुकले होते. धरणफुटीमुळे केवळ पिकेच वाहून गेली नाहीत, तर शेतजमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे तिवरे गावाच्या पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तिवरे गावाचं पुर्नवसन करण्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक न्यास मंदिर पुढे सरसावली आहे.

तिवरे गावाचं पुर्नवसन करण्याचा निर्णय सिद्धिविनायक न्यास मंदिर समितीने घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार न्याय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना सिद्धिविनायक न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिराला पत्र लिहून तिवरे धरणातील पीडितांच्या पुर्नवसनासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. तसेच खासदार विनायक राऊत यांनी मंदिर समितीकडे मदत मागितली होती.

शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिराला पत्र लिहून तिवरे धरणातील पीडितांच्या पुर्नवसनासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन सिद्धिविनायक न्यास समितीकडून बैठकीत भरीव तरतूद करण्याला मान्यता मिळाली. याबाबतचा पुढील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5