Skip to content Skip to footer

ज्याचं अन्न खातो, त्याला जगवतोय त्याला नौटंकी म्हणणारे नालायक – उद्धव ठाकरे

अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पहाव. मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेकडून पिक विमा कंपन्यां विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ठाकरे बोलत होते.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना तर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चावर स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघाती टीका केली होतो. परंतु शेट्टी यांनी ही टीका राजकीय द्वेशापोटी केलेली दिसून येत होती. कारण लोकसभा निवडणुकीला शिवसेनेच्या एका नवख्या उमेदवाराने शेट्टी यांचा पराभव केला होता आणि हा पराभव राजू शेट्टीच्या जास्त जिव्हाळी लागलेला दिसून येत होता. या द्वेशापोती ते शिवसेनेला लक्ष करत होते. या टीकेला सडेतोड उतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत शेट्टींना दिलेले आहे.

पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून सुरु झालेल्या मोर्चाने विमा कंपन्यांच्या कार्यालयावर धडक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Leave a comment

0.0/5