Skip to content Skip to footer

महाराष्ट्रातून काँग्रेस संपवणे हाच माझा उद्देश आहे – चंद्रकांत पाटील

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे आणि राज्यातील युतीच्या सर्व २८८ उमेदवारांसाठी काम करणे हाच मुख्य उद्देश आहे , असे सांगत राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की , आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हेच माझे पहिले ध्येय आहे. तसेच युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपबरोबरच शिवसेना व मित्र पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करायचे असून त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या योजनांबाबत भाष्य केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य पाहता, विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव करणे अश्यक आहे. मात्र आम्ही २०२४ मध्ये नक्की विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5