Skip to content Skip to footer

अजित पवारांच्या बैठकीला नगरसेवकांची दांडी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील नगरसेवकांची बैठक बोलवली होती. परंतु या बैठकीला राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवट्यावर आलेले आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीच्या २० नगरसेवकांनी दांडी मारल्याच चित्र पाहायला मिळाले. अजित पवार यांनी आगामी विधानसभेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. अजित पवारांनी बोलावल्या बैठकीला न जाण्याचं धाडस राष्ट्रवादीमध्ये सहसा कुणीही करत नाही. पण पुण्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल २० नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

पदाधिकाऱ्यांची संख्या कमी दिसल्याने अजित पवारांनी नगरसेवकांना हात वर करुन नगरसेवकांची हजेरी घेतली. त्यानंतर ही संख्या लक्षात आली. गैरहजर असणाऱ्या नगरसेवकांकडून गैरहजर राहण्यामागचं कारण मागण्यात आलं आहे. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक गैरहजर राहिल्याने ते पक्ष सोडण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर या नगरसेवकांनी पक्ष सोडला तर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल.

Leave a comment

0.0/5